गौरीची गाणी - वचन
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
वचन
नवर्याचे मायी दिवा लावी लवकर
काय लावू दिवा, दिवा चमकला
-मोठ्या घरचा पोकळ वासा
बापा काय बघून दिला मला
दारूचे वाटंला रं बापा
भुललास रं बाटलीला
-नाही भुललो बाटलीला, लेकी
जीव गुंतला वचनाला!
(दिवा चमकणे-दिवा विझणे)
वचन
नवर्याचे आई, दिवा लाव लवकर
काय लावू दिवा, दिवा चमकला
-मोठ्या घरचा पोकळ वासा
बापा काय बघून इथे दिलेस मला?
दारूच्या नादाला बापा
भुललास रे तू बाटलीला...
-नाही भुललो बाटलीला, लेकी
वचनात होता माझा जीव अडकला!
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP