मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|गौरीची गाणी|
काय काय पाह्यजे

गौरीची गाणी - काय काय पाह्यजे

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


काय काय पाह्यजे
हलदुले मलदुले ताना
देव गेला ओंढे राना
सीते गं, तुला काय काय पाहिजे
देवा रं, मला बांगड्या पाहिजेत

हलदुले मलदुले ताना
देव गेला ओंढे राना
सीते गं, तुला काय काय पाहिजे
देवा रं, मला फ़ेरवं पाहिजेत

हलदुले मलदुले ताना
देव गेला ओंढे राना
सीते गं, तुला काय काय पाहिजे
देवा रं, मला गाठी पाहिजेत

काय काय पाहिजे
हळदुल्या-मळदुल्या वेली
देव गेला दूर जंगली...
सीते ग, तुला काय काय पाहिजे
देवा रे, मला बांगड्या पाहिजेत

हळदुल्या-मळदुल्या वेली
देव गेला दूर जंगली...
सीते ग, तुला काय काय पाहिजे
देवा रे, मला जोडवी पाहिजेत

हळदुल्या-मळदुल्या वेली
देव गेला दूर जंगली...
सीते ग, तुला काय काय पाहिजे
देवा रे, मला गळेसर पाहिजे

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP