गौरीची गाणी - सरप
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
सरप
अंगना झाडी ग सून अंगना झाडी
सरप आला ओ ऐसा सरप आला
काठीख मार गं सुने काठीख मार गं
टिपक्याख डाल गं सुने टिपक्याख डाल गं
पान्याला जा ना गं सुने पान्याला जा गं
पान्याची आली हो ऐसी पान्याची आली
शिक्यावं भाकर ग सुने शिक्यावं भाकर
बोट्यांची भाजी ग सुने माशांची भाजी
भाकर खाल्ली ओ भाजी बोट्यापन खाल्ली
ओकारी आले ओ ऐसा ओकारी आली
मरन आला ओ ऐसा मरन आला
तिथंच मर सुने तिथंच मर गं
साप
अंगण झाडते ग सून अंगण झाडते
साप आला तेथे होअसा साप आला
काठीने मार ग सुने काठीने मार ग
उचलून टाक ग पल्याड उचलून टाक ग
पाण्याला जा ग सुने पाण्याला जाग
पाण्याहून आली हो अशी पाण्याहून आली
शिंक्यावर भाकरी ग सुने शिंक्यावर भाकरी
बोट्यांची भाजी ग सुने माशांची भाजी
भाकरी खाल्ली हो भाजी-बोट्याही खाल्ली
ओकारी आली हो अशी ओकारी आली
मरण माले असे मरण आले
तिथेच मर ग तिथेच मर ग
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP