गौरीची गाणी - मुल्हारी
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
मुल्हारी
नदीच्या किनारी उंबराचा झाडू
उंबराचे बनी भोजीगाया घरू
नदीला आला पूर न् भोजींग वायवत चालवेला
वायवत चालवेला न् भोजींग दरीला लागेला
आकाशी फ़िरे घारू
तिचा लक्ष भोजींगवरी
झेपाडा मारीला घारीने
भोजींग टोकीन्त उचलीला
भोजींग वालूवं नेऊन सोडीला
मग जादूमंतर झाला
त्याने एक घोडा सुवार केला
न् गेला बहिणीचे वाड्याला
बहिणीने दुरून देखिला
माझा बंधू मुल्हारी आला
घोडा बांधाया जागा त्याला दिला चुनबंदी आंगणा
झोपाया जागा त्याला दिला देवका खोलीमधी
आई बोले तिचे पोरांना, मामाला आपले मारू
पोरां बोले त्यांचे आईला, मामाला नको मारू,
एकलाच आमचा मामा, एकलाच तुझा बंधू
(पाठभेदात ’भोजींग’ ऐवजी ’पिंगला’ असेही वापरले जाते.)
मुळारी
नदीच्या किनारी उंबाराची झाडी
उंबराच्या बनी एका भुजंगाचे घर
नदीला आला पूर न् भुजंग वाहवत चालला
वाहवत चालला न् भुजंग दरीला लागला
आकाशी फ़िरते घार
तिचे लक्ष भुजंगावर
झेप घातली घारीने
भिजंग उचलला चोचीने
भुजंग वाळूवर नेऊन टाकला
मग जादूमंतर झाले
(त्याला मानरूप मिळाले)
तो एका घोड्य़ावर स्वार झाला
न् गेला बहिणीच्या वाड्याला
बहिणीने दुरून पाहिले
माझा भाऊ मुळारी आला
घोडा बांधण्या जागा दिली चुनबंदी अंगणात
झोपाण्यासाठी जागा दिली देवा़च्या खोलीत
आई बोले तिच्या पोरांना, मामाला आपल्या मारू....
पोरे बोलली आईला, मामाला नको मारू,
एकुलता आमचा मामा, एकुलता तुझा भाऊ
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP