मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|गौरीची गाणी|
रामा तुझा शेला

गौरीची गाणी - रामा तुझा शेला

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


रामा तुझा शेला
सरावन सरला ये सरावन सरला
भांदवा उंगवला ये भांदवे महिन्यात रं
गणपती चालीला ये गौरीला मुराळी

रामा तुझा शेला रे कशानं तिंबला
राम गेला येऊधाला रं शेला रगतानं तिंबला
सीतं तुझी चोळी गं कशानं तिंबली
शिमग्याचे उन्हानं रं चोळी घामानं घमिली

(मुराळी-मुळारी,मूळघेऊन आलेला, सासूरवाशिणीला माहेरी/सासरी
नेण्यासाठी येणार माणूस)

रामा तुझा शेला
श्रावण सरला रे श्रावण सरला
भाद्रपद आला रे भाद्रपद महिन्यात
गणपती चालला रे गौरीला मुळारी

रामा तुझा शेला रे कशाने भिजला
राम गेला युध्दाला रे शेला रक्ताने भिजला
सीते तुझी चोळी ग कशाने भिजली
शिमग्याच्या उन्हाने रे ’चोळी घामाने भिजली’

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP