वाट चाल रं
वाट चालं रं बुजड, वाट चालं रं यो
मी जातो पोरीचे खबरेला
टोप दाखव रं बुजड, टोप दाखव रं यो
देवा घेय रं बुजड, देवा घेय रं यो
दारू मांग बुजड , दारू मांग रं यो
वाट चालं रं बुजड, वाट चालं रं यो
मी जातो पोरीचे खबरेला
हांडी दाखव रं बुजड, हांडी दाखव रं यो
देवा घेय रं बुजड, देवा घेय रं यो
दारू मांग बुजड , दारू मांग रं यो
वाट चालं रं बुजड, वाट चालं रं यो
मी जातो पोरीचे खबरेला
तवा दाखव रं बुजड, तवा दाखव रं यो
देवा घेय रं बुजड, देवा घेय रं यो
दारू मांग बुजड , दारू मांग रं यो
वाट चाल रे
वाट चाल रे बुजड, वाट चाल रे अशी
-मी जातो पोरीच्या खबरेला
टोपली दाखव रे बुजड, टोपली दाखव रे अशी
मागून घे रे बुजड, मागून घे रे अशी
दारू माग रे बुजड, दारू माग रे अशी
वाट चाल रे बुजड, वाट चाल रे अशी
-मी जातो पोरीच्या खबरेला
हंडी दाखव रे बुजड, हंडी दाखव रे अशी
मागून घे रे बुजड, मागून घे रे अशी
दारू माग रे बुजड, दारू माग रे अशी
वाट चाल रे बुजड, वाट चाल रे अशी
-मी जातो पोरीच्या खबरेला
तवा दाखव रे बुजड, तवा दाखव रे अशी
मागून घे रे बुजड, मागून घे रे अशी
दारू माग रे बुजड, दारू माग रे अशी
हे सोंगाचे गाणे आहे. आजूबाजूच्या घरांमधील हांडी हा सोंगाड्या मागून घेतो. ती भांडी डोक्यावर ठेवून नाचत गाणे म्हणतो.