कांबड नाचाची गाणी - भुडूक फ़ुटला
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
भुडूक फ़ुटला
भुडूक फ़ुटला वज्रामधी रं वज्रामधी
ते डवरे कुटलं सतीमधी रं सटीमधी
भुडूक फ़ुटला वज्रामधी रं वज्रामधी
ते बांडगं कुटलं लग्नामधी रं लग्नामधी
भुडूक फ़ुटला वज्रामधी रं वज्रामधी
ते डोकर्या कुटलं पाचवीमधी रं पाचवीमधी
भुडूक फ़ुटला वज्रामधी रं वज्रामधी
ते पोरी कुटलं देजामधी रं देजामधी
(सटी/लग्न/पाचवी/देज-वेगवेगळे विधी, या प्रसंगी नाच-गाणी होतात, बांडे-तरुण, कुटणे-चीत करणे/हारवणे(नाच-गाण्यात) या अर्थाने, वाज्रातून पाणी फ़ुटणे-अशक्य असलेली गोष्ट शक्य करून दाखवणे)
पाणी फ़ुटले
पाणी फ़ुटणे वज्रामधून रे बज्रामधून
त्या म्हातार्यांना ठोकले रे सटीच्यावेळी
पाणी फ़ुटणे वज्रामधून रे बज्रामधून
त्या बांड्यांना ठोकले रे लग्नाच्यावेळी
पाणी फ़ुटणे वज्रामधून रे बज्रामधून
त्या म्हातार्यांना ठोकले रे पाचवीच्यावेळी
पाणी फ़ुटणे वज्रामधून रे बज्रामधून
त्या पोरींना ठोकले रे देजाच्यावेळी
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP