कांबड नाचाची गाणी - तुरुख मारला
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
तुरुख मारला
तुरुख मारला तुरखाला मी खाडा खनन
तुरुख मारला तुरखाला मी खाड्यान गाडन
तुरुख मारला तुरखाला मी माती वालन
तुरुख मारला तुरखाला मी काट्या दाबन
तुरुख मारला तुरखाला मी दगडी दाबन
तुरुख मारला तुरखाला मी नेऊन टाकन
तुरुख मारला तुरखाला कावलं खातीन
अस्वल मारले
अस्वल मारले, अस्वलासाठी मी खड्डा खणेन
अस्वल मारले, अस्वलासाठी मी खड्ड्यात गाडेन
अस्वल मारले, अस्वलासाठी मी माती ओढेन
अस्वल मारले, अस्वलासाठी मी काटे दाबेन
अस्वल मारले, अस्वलासाठी मी दगड रचेन
अस्वल मारले, अस्वलासाठी मी नेऊन टाकेन
अस्वल मारले, अस्वलासाठी मी कावळे खातील
तुरुख या शब्दाचा अर्थ तुर्क-शत्रु असा आहे. तथपि पाड्यावर येउन त्रास देणार्या अस्वलासारख्या जंगली प्राण्यांना उद्देशून हे गीत म्हटले जाते. त्या गाण्याला घाबरून प्राणी पुन्हा येणार नाहीत असा समज आहे
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP