कांबड नाचाची गाणी - शिनगार करी ग
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
शिनगार करी ग
हिरोबा देव हिमायीला बोले
हिमायी शिनगार करी गं
हिरोबाचे हाती भिंगोरी दोरी
हिमायी शिनगार करी गं
हिमायीचे हाती फ़ुलांचा हार
घाली हिरोबाचे गली रं
हिरोबाचे हाती फ़ुलांचा झेला
माली हिमायीचे माथी रं
शृंगार कर ग
हिरोबा देव हिमायीला सांगे
हिमायी शृंगार कर ग
हिरोबाच्या हाती पिळाची दोरी
हिमायी शृंगार कर ग
हिमायीच्या हाती फ़ुलांचा हार
घालते हिरोबाच्या गळ्यात रे
हिरोबाच्या हाती फ़ुलांचा झुबका
माळतो हिमायीच्या केसांत रे
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP