कांबड नाचाची गाणी - मानीला
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
मानीला
भावो ये ये ये मानीला रं
भावो ते ते ते मानीला रं
भावो आज गायी कोणीकडे
साले गोंडाले मानीला गं
भावो ये ये ये मानीला रं
भावो ते ते ते मानीला रं
भावो आज शेल्या कोणीकडे
साले खडके मानीला गं
भावो ये ये ये मानीला रं
भावो ते ते ते मानीला रं
भावो आज म्हसी कोणीकडे
साले बोढणे मानीला गं
माळावर
भावजी या या या माळावर
भावजी त्या त्या त्या माळावर
भावजी आज घायी कोणीकडे
-मेव्हणे, गोंडाळ माळावर!
भावजी या या या माळावर
भावजी त्या त्या त्या माळावर
भावजी आज शेळ्या कोणीकडे
-मेव्हणे, खडके माळावर!
भावजी या या या माळावर
भावजी त्या त्या त्या माळावर
भावजी आज म्हशी कोणीकडे
-मेव्हणे, बोढणे माळावर!
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP