कांबड नाचाची गाणी - खेल मांडला
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
खेल मांडला
वारा गं वाजं, पिपल खलालं
आशेरीवं पाणी झलालं....
कोणी देवानं खेल मांडला रं
नारानू देवानं खेल मांडला रं....
वारा गं वाजं, पिपल खलालं
आशेरीवं पाणी झलालं....
कोणी देवानं खेल मांडला रं
हिमाय देवानं खेल मांडला रं....
(आशेरी-डोंगराचे नाव)
खेळ मांडला
वारा वाजतो ग, पिंपळ सळसळतो
आशेरी डोंगरावर पाऊस झळाळतो
कोणा देवाने खेळ मांडला रे
नारान देवाने खेळ मांडला रे
वारा वाजतो ग, पिंपळ सळसळतो
आशेरी डोंगरावर पाऊस झळाळतो
कोणा देवाने खेळ मांडला रे
हिमाय देवाने खेळ मांडला रे
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP