कांबड नाचाची गाणी - पालखी

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


पालखी
आंब्यावरून आंबा पडला
आंब्याला लागली माती
नारान देवाची पालखी
अली चांदण्या राती

चिंचेवरून आंबा पडला
चिंचंला लागली माती
हिरव्या देवाची पालखी
अली चांदण्या राती

बोरीवरून आंबा पडला
बोराला लागली माती
वाघोब देवाची पालखी
अली चांदण्या राती

आवल्यावरून आंबा पडला
आवल्याला लागली माती
हिमाय देवाची पालखी
अली चांदण्या राती

पालखी
आंब्यावरून आंबा पडला, त्याला लागली माती
नारान देवाची पालखी आली चांदण्या राती

चिंचेवरून चिंच पडली, त्याला लागली माती
हिरव्या देवाची पालखी आली चांदण्या राती

बोरीवरून बोर पडला, त्याला लागली माती
वाघोबा देवाची पालखी आली चांदण्या राती

आवळ्यावरून आंबा पडला, त्याला लागली माती
हिमाय देवाची पालखी आली चांदण्या राती

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP