कांबड नाचाची गाणी - चोर आला चोर
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
चोर आला चोर
संभाळ बिबि चोर आला चोर
सावल्या नाईक घरान नाही वाटंला लागला चोर
संभाळ बिबि चोर आला चोर
सावल्या नाईक घरान नाही शिवंला लागला चोर
संभाळ बिबि चोर आला चोर
सावल्या नाईक घरान नाही येशीला लागला चोर
संभाळ बिबि चोर आला चोर
सावल्या नाईक घरान नाही दाराशी लागला चोर
संभाळ बिबि चोर आला चोर
सावल्या नाईक घरान नाही कणग्याला लागला चोर
चोर आला चोर
सांभाळ देवी, चोर आला चोर
सावळ्या नाईक घरात नाही वाटेने निघाला चोर
सांभाळ देवी, चोर आला चोर
सावळ्या नाईक घरात नाही शिवेला निघाला चोर
सांभाळ देवी, चोर आला चोर
सावळ्या नाईक घरात नाही वेशीवर निघाला चोर
सांभाळ देवी, चोर आला चोर
सावळ्या नाईक घरात नाही दाराशी निघाला चोर
सांभाळ देवी, चोर आला चोर
सावळ्या नाईक घरात नाही कणग्याला निघाला चोर
हे एक सोंगाचे गाणे आहे. घरातील अन्नाधान्याचे रक्षण करण्यासाठी देवीला केलेली आळवणी त्यात आहे.
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP