कांबड नाचाची गाणी - बाजारात
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
बाजारात
भावो बाजारात बाजारात काय करं
भावो पसाभर पसाभर बिरडी घे
भावो बंडीला बंडीला चर लावं
साली बाजारात बाजारात काय करं
साली पसाभर पसाभर चिमटं घे
साली केसांना केसांना चर लावं
बाजारात
भावजी बाजारात बाजारात काय करतो
भावजी पसाभर पसाभर बटणं घेतो
भावजी बंडीला बंडीला रांगेत लावतो
मेव्हणी बाजारात बाजारात काय करतो
मेव्हणी पसाभर पसाभर क्लिपा घेतो
मेव्हणी केसांना केसांना रांगेत लावते
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP