कांबड नाचाची गाणी - बारा बैलांचा टाडा
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
बारा बैलांचा टाडा
बारा बैलांचा टांडा रे धाटावरून उतरेला रे
घाट काय काय पिकेला रे, मागं परतेला रे
बारा बैलांचा टांडा रे त्यांच्या पाठीवं गोणी रे
शेंदराच्या गोणी रे, घाट काय उतरेला रे
बारा बैलांचा टांडा रे धाटावरून उतरेला रे
घाट काय काय पिकेला रे, मागं परतेला रे
बारा बैलांचा टांडा रे त्यांच्या पाठीवं गोणी रे
गुलालाच्या गोणी रे, घाट काय उतरेला रे
बारा बैलांचा टांडा रे धाटावरून उतरेला रे
घाट काय काय पिकेला रे, मागं परतेला रे
बारा बैलांचा टांडा रे त्यांच्या पाठीवं गोणी रे
नारलाच्या गोणी रे, घाट काय उतरेला रे
बारा बैलांचा तांडा
बारा बैलांचा तांडा रे, घाटावरून उतरला रे
घाटात काय काय पिकलं रे, ते घेऊन मागे परतला रे
बारा बैलांचा तांडा रे त्यांच्या पाठीवर पोती रे
शेंदूराची पोती रे, घाट कसा उतरला रे
बारा बैलांचा तांडा रे, घाटावरून उतरला रे
घाटात काय काय पिकलं रे, ते घेऊन मागे परतला रे
बारा बैलांचा तांडा रे त्यांच्या पाठीवर पोती रे
गुलालाची पोती रे, घाट कसा उतरला रे
बारा बैलांचा तांडा रे, घाटावरून उतरला रे
घाटात काय काय पिकलं रे, ते घेऊन मागे परतला रे
बारा बैलांचा तांडा रे त्यांच्या पाठीवर पोती रे
नारळांची पोती रे, घाट कसा उतरला रे
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP