कांबड नाचाची गाणी - निवट्याची भाजी
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
निवट्याची भाजी
झिलीमी किरकंडी घे साले
खाजनाला चल ग साले खाजनाला चल
साले निवटं खुंद साले निवटं खुंद
निवटं धर साले निवटं धर गं
घरा चल साले घरा चल गं
भाजी कर साले भाजी कर गं
जेवाय वाढ साले जेवाय वाढ गं
दोघंच खाऊ साले दोघंच खाऊ गं
निवट्यांची भाजी
जाळीदार टोपली घे ग मेव्हणे
खाजणाला चल ग मेव्हणे
निवटे शोध ग मेव्हणे
निवटे धर ग मेव्हणे
घरी चल ग मेव्हणे
भाजी कर ग मेव्हणे
जेवायला वाढ ग मेव्हणे
आपण दोघेच खाऊन टाकू ग मेव्हणे
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP