कांबड नाचाची गाणी - नारीचा विंचू

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


नारीचा विंचू
सिताफ़ळीच्या झाडाला टेकू दिला रं
तथं नारीच्या विंचूनी चमका दिला रं
व्हय रं मैदू वैदूला बोलवाया रं
वैदूला बोलवाया वसई शहराला रं
आला आला वैदू बैसला पलंगावरी रं
भारी लिंबू फ़ेकतो तो नारीवरी रं
नारीचा विंचू करीतो नानाप री रं
(नारीचा विंचू उतरला नानापरी रं)

नारीचा विंचू
सिताफ़ळाच्या झाडाला टेकू दिला रे
तिथेच नारीच्या विंचावाने झटका दिला रे
जा रे मैदू, वैदूला बोलावू आण रे
वैदूला बोलाव, वसई शहरातून रे
आला आला वैदू बसला पलंगावर रे
भारी लिंबू फ़ेकतो तो नारीवर रे
नारीचा विंचू करतो विविध तर्‍हा रे
(नारीचा विंचू उतरला विविध तर्‍यांनी रे)

हे एक शृंगारिक आशयाचे गाणे आहे. पाठभेदात याचे दोन शेवट आहेत असे आढळले. ’मैदू’ या नावाच्या जागी काही वेळा ’पतीऊ’ हा शब्द देखील वापरला जातो

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP