कांबड नाचाची गाणी - घोशे दादा
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
घोशे दादा
वाटंचे रे पाखरू घोशे घोशे दादा
येवढा निरोप निरोप सांगजो
मामाला पागीर नेसाया सांगतो
वाटंचे रे पाखरू घोशे घोशे दादा
येवढा निरोप निरोप सांगजो
मामीला मांद्री नेसाया सांगतो
वाटंचे रे पाखरू घोशे घोशे दादा
येवढा निरोप निरोप सांगजो
मेव्हण्याला दुंदा नेसाया सांगतो
वाटंचे रे पाखरू घोशे घोशे दादा
येवढा निरोप निरोप सांगजो
मेव्हणीला साडा नेसाया सांगतो
घोशे दादा
वाटेवरच्या पाखरा घोशे दादा
एवढा निरोप निरोप सांग जा
सासर्याला जाळे नेसायाला सांग जा
वाटेवरच्या पाखरा घोशे दादा
एवढा निरोप निरोप सांग जा
सासूला चटई नेसायाला सांग जा
वाटेवरच्या पाखरा घोशे दादा
एवढा निरोप निरोप सांग जा
मेव्हण्याला गोणपाट नेसायाला सांग जा
वाटेवरच्या पाखरा घोशे दादा
एवढा निरोप निरोप सांग जा
मेव्हणीला साडी नेसायाला सांग जा
हे एक उपहासात्मक विनोदी ढंगाचे गाणे आहे. यात जावई एका पाखराच्या मार्फ़त आपण सासुरवाडीला येत आहोत असा निरोप देत आहे. तेथील दारीद्रय एवढे आहे की माणसांच्या अंगावर लाज झाकण्यांइतके कपडेही नसतात; त्यामुळे मासे पकडण्याचे जाळे, चटई, गोणपाट वस्त्राप्रमाणे गुंडाळून ध्यावेत असे तो सांगतो आहे.
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP