कांबड नाचाची गाणी - चित्रु

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


चित्रु
नांगा हो पोरीहो चित्रु बगुली
पोरीही नांगेलुच
पोरांना दाखवावी...

नांगा हो पोरीहो चित्रु बगुली
पोरांही नांगेलुच
बायांना दाखवावी...
(नांगेलु-नागडे, नांगणे या शब्दाचा अर्थ ’बघणे’ असादेखील होतो.)

चित्र
नागड्याचं ’चित्र’ बघायचं का पोरींनो
पोरीही नागड्याच
पोरांना दाखवावो...

नागड्याचं ’चित्र’ बघायचं का पोरींनो
पोरंही नागड्याच
बायांना दाखवावो...

(हे सोंगाचे गाणे आहे. सोंग घेतलेल्याने कमरेला रूमालाने लिंगाचा आकार करून बांधलेला असतो. ते तो सगळ्यांना दाखवत फ़िरतो. सगळे माना फ़िरवतात, लाजतात, चिडवतात, हसतात.)

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP