माधव जूलियन - चान्दण्यांतील हुरहुर
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
[जाति मनमोहन]
या वेडया तेढया मनीं माझिया कहर करी हुरहूर ध्रु०
शान्त किति या औन्च जागीं,
तगमगें मी परि अभागी -
का व्यर्थ पडावें असें चान्दणें सुन्दर गार टिपूर ? १
अमृताने सुष्टि न्हाली.
चन्द्रिकेचें क्षौम ल्याली,
हा हिजवर औधळे चूर रुप्याचा का हिम का कापूर ? २
ऐन्दु आनन्दाश्रु गाळी,
श्यामलेच्या चारुभाळीं
मधु खिन्न फाकतो नव नवरीच्या आनन्दाचा नूर. ३
दुग्धगङगा गुप्त गगनीं,
औत्सवीं या जेऐ भुवनीं -
ये अधान्तरीं हा सरितेवरुनी लोट्त पाण्डुर पूर. ४
शैलशिखरीं शुक्र न लपे,
कृत्ति कांचा पुञ्ज हरपें,
हो ब्रम्हाहृदय तो फिकट, होऊनी जाऔ व्यास चुकूर. ५
अन्धुके ती गर्द झाडी,
जींत नगरी झोप काढी,
परि दिवे फिकट, ते, खडा पहारा करणें त्यांस जऊर. ६
शुक्र टाकी नजर मागे.
अस्तगिरि अन औतरुं लागे,
हिण्डतों टेकडीवर रेङगाळत मीच चिन्तनीं चूर. ७
सृष्टि अगदी शान्त होऐ,
जाय झोपीं बायु तोही,
वेताळ मनींचा न निजे - छे. पण रात्रिचाच हा शूर ! ८
कातळाच्या वर पडावें.
चान्दणें हें पाङघरावें.
आणखी करावें काय हराया हृदयींचें काहूर ? ९
सूर तों हे कुठुनि येती ?
अन्तरींचा ठाव घेती -
छेडितें कोण हे सारङगीवर वागीश्वरिचे सूर ? १०
जवळ आले, स्पष्ट झाले,
दूर गेले, लुप्त झाले,
जीवास लावुनी अधिकाच चटका गेले - गेले दूर ! ११
हाय ! माझें घ्येय का तें
गूढ दुरुनी गीत गातें ?
निर्भरालिङगनाविण न भरे पण माझें मन दुष्पूर ! १२
ता. २० जानेवारी १९२४
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP