मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|
मेलों तरी मेलों

माधव जूलियन - मेलों तरी मेलों

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[अभङग]

मेलों तरी मेलों
मरण न चुके
मन माझें भुके
घ्येयासाठी. १

घ्येयाच्या कारणीं
श्रम आणि काळ
आऔनिया फळ
नाही. बरें ! २

परी थेम्ब थेम्ब
माझिया रक्ताचा
शूर वीर साचा
होऐल ना ? ३

लढूनि मरतां
मरे सैन्य सारें.
परी औरे वारें
वीरश्रीचें. ४

जीविताचें माझ्या
निघेल तें सार
होवो अनिवार
माझ्यामागे. ५

तेंहि न निघालें
तरी चिन्ता नाही
घ्येया, तुझ्यापायीं
देह पडो. ६

पावोत सामान्य
आशा माझ्या भङग
द्दढ अन्तरङग
तुझ्या ठायीं.

ऑक्टोबर १९२७

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP