माधव जूलियन - बुल्बुलास
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
बुल्बुला, रडशि कां बसुनि दुरी ?
ही अशी प्रतीक्षा फोल पुरी ! ध्रु०
गुलाबकलिका ही बघ फुलली,
गन्धविभ्रमीं बाही जवळी -
औठ, घाल झड, हृदयीं कवळी ! कण्टकभय का सले औरीं ? १
कण्टक सन्तत मजही छळतो,
रुधिर न, हा हृद्रङग औधळतो,
अन्तरङगकल औगिच न कळतो; मित्रच हा, इति जरि असुरी, २
गुलाब कण्टकहीन असेना,
सुळाकडे ने वसन्तसेना, ३
श्रीहि साहसाबीण हसेना, मर ! जाशिल मग अमरपुरीं !
ता. २७ मे १९२७
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP