माधव जूलियन - हाकाटी
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
[अभङग]
कशासाठी ? कोणासाठी ?
चाले अन्तरीं हाकाटी.
हृदयींची आस आस.
चूर झाली सावकाश.
प्रीतिकिर्तीचे डोलारे
गेले कोसळून सारे.
जनतेचा जो भुकेला
तिने केला अर्धा मेला.
झाली जिवाची चाळण,
धीर चालला गळून
बण्डखोर तारुण्याचें
रक्त नसोनसीं नाचे;
परी क्षीण माझ्या मनीं
आस कोठे सञ्जीवनी ? १
पुस्तकींच्या माणकांच्या
व्यवहारीं होती काचा
व्योमचुम्बी कल्पवृक्ष
होती कोळपून रूक्ष
कल्पनेच्या स्वर्गांतून
खाली आदळे तरुण
पूज्य येथे ऐक माया
तिच्यावीण सारी माया !
कृपा तिची होऐ तर
पङगु औल्लङघी डोङगर !
मुका होऐ बृहस्पति,
मिळे पाप्याला सद्नति !
सर्व सक्तींची जननी
हीच भवींची तरणी. २
मदें अहेरेलें हिला.
आता प्रभाव पाहिला
आता पाहिला प्रभाव
काही लागेना निभाव
सत्ता करी तेंच सत्य
मान वाकविणें पथ्य
जरी पीडा दे कायदा
न्याय त्याला प्रेमें वदा
लोक - रावी येथे ओठीं
हाव सुल्तानीची पोटीं.
प्रेम सुवर्णाच्या मागे,
धन जोडी जीवधागे.
धूळ झाली येथे घ्येयें
आणि वेदान्तप्रमेयें. ३
विकूनिया स्वत्वमणी
नको साम्राज्यरमणी !
होरा शुद्ध अन्तरङग.
होवो आकाङक्षांचा भङग,
बन्द होअंऊ द्या वाजणें
थोरवीचीं शहाजणें,
विस्मृतीच्या गङगेमाजी
नामदीप लोटा आजी.
दोन दीस करमाया
नको दीस करमाया
नको मुलाम्याची माया
मग काय हवें तरी
हेंच कळेना अन्तरीं.
आंत बाहेर हें सुनें
वाटे नको नको जिणें ! ४
तुकोबाच्या पाण्डुरङगा,
भावनेच्या अन्तरङगा !
बोरी हीच चन्द्रभागा,
हीच पण्ढरीची जागा !
तुम्ही त्रैलोक्याचे राजे
तुम्ही मायबाप माझे.
झाला औशीरां आठव
तरी येअऊं द्या हो द्रव.
औचलून घ्या हो मला
घट्ट औराशी आवळा.
तेंच माझें परन्धाम
सुखी जेथे आत्माराम.
मग थाम्बेल हाकाटी
कशासाठी ? कोणासाठी ! ५
ता. २२ जुलै १९२४
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP