मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|
सर्वस्वाचा यज्ञयाग

माधव जूलियन - सर्वस्वाचा यज्ञयाग

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[जाति श्यामाराणी]

अन्तरीं सारखी आग आग !
दे दैव त्यांतुनी करुनि डाग.

जीवनाविना मत्स्य तडफडे,
काठावर बन्धनीं धडपडे,
घ्येय जवळ तो बघे चरफडे - स्फटिकशान्त हिमजलतडाग ! १

स्वैरालापी, प्रेमारायण
पुष्पविलासी, कविताचारण
पडे तोच खग फशीं पहा पण द्दष्टिपुढे जों ऐन्द्रबाग !२

प्रीतिशोधनीं थकुनी भागुनि
होतां संन्यासी वैतागुनि
येऐ सुभद्रा भेटीलागुनि निषिद्ध ते जंव रङ्ग - राग. ३

ज्याच्यासाठी झुरतें अन्तर
येऐ निराशोत्तर तें मन्थर.
विलम्ब निमिषाचाच निरन्तर ! अवेळींच ये त्यास जाग. ४

मृत जीवित हें. जिवन्त ही मृति !
टिकेल कुठवर मनुजाची धृति ?
अतर्क्य दैवा, काय तुझी कृति ?
सर्वस्वाचा यज्ञयाग ! ५

ता. २२ सप्टेम्बर १९२८

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP