मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|
राजभक्ति

माधव जूलियन - राजभक्ति

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[जाति भूपति]

कां हवा तमाशा असा राजभक्तीचा ? ध्रु०

लाविती तोरणें, चित्रें जन पुरवासी,
मण्डपास ऊजळी बिजली होऊनि दासी,
जयघोषें शीण न ये पोकळ वाद्यांसी,
आक्रोश परि बुडे कष्टचूर जगतीचा. १

चालत्या काळचे अनुचर भूपवराचे
कारन्जें ऊडवित गन्धोदकधारांचें
प्रतिमेस भार घालोत पुष्पहारांचे,
ही पोट - पुजा ! हा मान कसा व्यक्तीचा ? २

हें पोट गावविल त्याचेंही स्तुतिगीत
राष्ट्रीय दिव्य, हित जो राही न करीत,
हतबुद्ध मत्त जो जन्मदत्त मधु पीत -
कळसूत्री पुतळा वा बागुल सक्तीचा ! ३
 
जो जातां सिंहासनीं येऊलच कोणी,
घेऊल सत्त्व जो कष्टकर्‍यांस पिळोनी,
देऊल ऊपाशी नृसिंहपाठीं गोणी,
श्वानांस आणखी लाभ खास - पङक्तीचा ! ४

परि ‘चिरञ्जीव !’ कां तुज न म्हणावें राजा ?
जनहितार्थ खपशी, न परी गाजावाजा;
कृति तुझी, स्मृति तुझी ठसे अन्तरीं माझ्या,
जनदास तू नृपा, वाट - करी प्रगतीचा ! ५

९ जानेवारी १९३४

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP