माधव जूलियन - भुकेलें हृदय
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
[अभङग]
हृदय ऐकाकी
कळवळे भारी
कोकिळ शेजारीं
म्हणे, कूऔ ! १
विचित्र स्वप्नांची
सम्पली रजनी
शान्तिलाभ मनीं
परी नाहीं २
पडे गच्चीवर
गार दहिवर
आणि गहिंबर
आंत दाटे, ३
जीव गोन्धळून
होतसे औदास
म्लानता नभास
सकाळीं का ? ४
मित्र तो औषेचा
धुक्यांत गवसे
आशामुखीं हसे
म्लान म्लान. ५
खालती धावती
कामाचीं माणसें
विश्रान्तीच नसे.
पोटाला या. ६
भुकेलें हृदय
धडधडे भारी
कोकिळ शेजारीं
म्हणे, कूऔ ! ७
ता. २७ ऐप्रिल १९२७
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP