माधव जूलियन - पापशङकी
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
[शार्दूलविक्रिडित]
मी सन्ध्यासमयास कष्ट करुनी येतों घरासन्निध
तों येतात मनीं तशा झरझरा शङकाहि नानाविध:
कानीं धावुनि जीवा आतुर बसे घ्याया तुझी चाहुल,
अन माझें थबकून जों जड पडे दारामधे पाऊल.
तों येऊ तव शब्द खोडकर तो खेळांत आऊसवें.
अन तेथूनच पाडसा, तुज मुदें मी हाक मारीं जवें.
तू जो अर्पिशि पाहुनी वर मला नेत्रांतुनी माधुरी
तों चुम्बीं तुज मी झणी ऊचलुनी दाबीत माझ्या ऊरीं !
मी कार्यीं गढतां कुठूनिहि जरी ये क्रन्दनाचा स्वर
दे धक्का ह्दयास तो. दवडवी तूझ्याकडे सत्वर;
पाहीं मी तर पाळण्यांत दिसशी तू शान्त निद्रासुखें,
शीर्षीं ठेवुनि हात खिन्न कुतुकें घेऊं तुझे मी मुके.
व्यापी बाहिर मेघराजि नभ हें, पाऊसही पाडिते -
बाळा, यांतुनि फाकती मधुर हीं तूझीं सुवर्ण - स्मितें !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP