माधव जूलियन - हरिताम्बरा
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
[जाति केशवकरणी]
विलसत जावी हिरवळींतुनी स्फटिकाची जशि झरी
तशी ही तव तनु हरिताम्बरीं,
शारदसन्ध्याराग ठसावा प्रशान्त सरसीहृदीं
छटा ती ये तव कान्तीमधी.
चित्रा - खाती जशा हसाव्या अथाङग तम - सागरीं
चमक ती तव नेत्रीं सुन्दरी.
कुतुकद्युति वितरिशी किशोरी, ऊनपावसापरी;
भरे तव माया हृदयान्तरीं.
ज्योत्स्नेपरि रमणीय गूढ तू अन शारद केवल
- बघुनि परि का हृदयीं ये कळ ?
ता. १ ऑगस्ट, १९३३
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP