माधव जूलियन - प्रार्थना
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
[अभङग]
प्रभो, मज भेट
परंतु ऐकाच
मूर्तीमाजी साच
दिसूं नको.
अनन्त गोचरीं
भरली ही सृष्टि
प्रत्येकांत द्दष्टि
तुज बघो. २
लाटांच्या नर्तनीं
पाऊस झडींत
ऐकूं दे सङगीत
प्रभो, तुझें, ३
भव्य हें गगन
क्षुद्र खाली तृण
दोहींत करूण -
रस तुझा, ४
अणुरेणूंमाजी
तुझीच विभूती
मला देऐ. ५
वियोगाची भीती
वैराग्याची नीती
काही नसो चित्तीं
प्रीतीवीण. ६
वाटे तुझ्यावीण
मज नाही बळ
अन्तरीं विव्हाळ
सदैव मी. ७
ता. २७ जुलै १९२८
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP