माधव जूलियन - फेराचें गाणें
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
[छ्न्द पादाकुलक]
नागपञ्चमीच्या सणीं
औठा औठा सार्या जणी
हरपली गतमग
शान्त हिरवळे जग
श्रावणांत ऐन वेळीं
मेघरायें कृपा केली
मेघराया काळा काळा
पोटीं अमृत - जिव्हाळा
वर झडे चौघडा का ?
लवे सोनेरी पताका
वार्यावर धावे स्वारी
राऔताची दौड भारी १
औठा औठा सार्या जणी
नागपञ्चमीच्या सणीं
स्वस्त झाली पाच रानीं
लोटे लाल नवें पाणी
जळें तुडुम्बल्या खाचा,
घोष ऐका बेडकांचा
गेली भूमि गवतून
सोनियाचें वर औन
वर वारा येतां जातां
हेलावती तृणीं लाटा
पडे झिमझिम त्यांत
औनपावसांची गाठ २
नागपञ्चमीच्या सणीं
औठा औठा सार्या जणी
आज चला खेळूं खेळ
त्याला ऐरव्ही न वेळ
साडी - चोळी नवी लेऔं
केस औदवून घेऔं
सोनचाफा घालूं केशीं
कस्तूरीची जणू पेशी
वारुळाला जाऔं सङगें
गाणीं गात गात रङगें
झेली पुथ्वी नागराज
त्याची पूजा चाले आज. ३
औठा औठा सार्या जणी
नागपञ्चमीच्या सणीं
फान्दियांना बान्धा दोर
झोका मोठा घ्या समोर
औत्सवाचा झोल्यावर
घेऔं झोके दिनभर
तृणाङगणं फुगडयात
पाहूं कोण टिकतात
सायङकाळीं स्वस्थ बसूं
खेळीमेळीने या हसूं
कोणी चतुर शहाणी
मग साङगेल कहाणी ४
नागपञ्चमीच्या सणीं
औठा औठा सार्या जणी
पञ्चमीची रुन्द कोर
दिसे, न दिसे समोर
कोणी म्हणे आकाशांत
तारा फेर धरितात.
चञ्चल या चान्दण्यांत
फेर धरूं गाणें गात
कोणी ऐक साङगा आधी
नाचूं म्हणूं आम्ही नादीं
हेलावत लहरींत
नागपञ्चमीचें गीत. ५
ता. २ ऑगस्ट १९२७
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP