माधव जूलियन - कशासाठी ? पोटासाठी !
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
[छन्द द्पादाकुलक]
कशासाठी पोटासाठी
खण्डाळ्याच्या घाटासाठी ध्रु०
चला खेळूं आगगाडी.
झोका औन्च कोण काढी ?
बाळू, नीट कडी धर
झोका चाले खाली वर
ऐका कूकुक ! शीट झाली
बोगद्यांत गाडी आली
खडखड भकभक
अन्धारांत लखलख
ऐन्जिनाची बघा खोडी
बोगद्यांत धूर सोडी
नका भिऔं थोडयासाठी
लागे कुत्रें भित्यापाठी. १
औजेड तो दूर कसा
ऐवलासा कवडसा
नागफणी डावीकडे
कोकण तें तळीं पदे
पाठमोरी आता गाडी
वाट मुम्बऐची काढी
खोल दरी औल्लासाची
दों डोक्याचा राजमाची
पडे खळाळत पाणी
फेसाळल्या दुधावाणी
आता जरा वाटे दाटी
थण्ड वारा वरघाटीं २
डावलून माथेरान
धावे गाडी सुटे भान
तारखाम्ब हे वेगांत
मागे मागे धावतात
तार खाली - वर डोले
तिच्यावर दोन होले
झाडी फिरे मण्डलांत
रूळ सङगें धावतात
आली मुम्बाइ या जाऔं
राणीचा तो बाग पाहूं
गर्दी झगमग हाटीं -
कशासाठी ? पोटासाठी ! ३
ता. १८ ऑगस्ट १९२७
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP