मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|
अजुनि किती छळतोस

माधव जूलियन - अजुनि किती छळतोस

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[जाति चन्द्रकान्त]

अजुनि किती छळतोस दैवा, अजुनि किती छळतोस ? ध्रु०
हृदय करपलें, योग्य अता मज मरुभूमी ही ओस,
गोड भास तों ऐथेहि दावुनि देशी कटु सन्तोष.
म्हणशि, “मृगाक्षीनयनीं पाणी तरल, शमव जा शोष !” २
गुप्त भुकेने मी झुरमुरतां करावया परिपोष
नभीं कृत्तिका दावुनि म्हणशी, “घे द्नाक्षांचा घोस !” ३
परिस्थितीने घट्ट जखडिशी, फोडूं का हा कोड ?
क्षणभर झिङगुनि सुखप्रकाशीं नाचूं का बेहोश ? ४

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP