माधव जूलियन - गोड बाल्य
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
[चाल ‘मशि बोलुं]
सर्वस्व सुखाचें वाटे न कुणाला बाल्य गोड ? ध्रु०
काहीहि मिळो त्या सङगें
खेळांत कुतुकुनी रङगे;
मन भङगे नच जरि चाले संसारीं मोडतोड. १
हट्टहा करी परि माझा
चिमुकला घरींचा राजा
सवंगडी हवा मी त्याला, नित त्याची ऊक खोड. २
किति लाडिक हाका मारी !
आर्तता मधुर ती न्यारी,
याचना करि कशी नेत्रीं मी म्हणतां ‘सोड सोड !’ ३
निरुपायदूर मी होतां
हम्बरडा फोडी मोठा -
मज सहन न हो कळ त्याची, तळहातींचाच फोड ! ४
बाल्यावर शोकच्छाया
न पडे हें म्हणणें वाया:
तीव्रतेस या शोकाच्या कोठे मी पाहुं जोड ? ५
निमिषैक अश्रु चमकूनी
जरि जाती सहज सुकूनी,
चाहुलीसरशि परि घेशी चमकूनी बाळ ओढू. ६
कालची खन्त ती नाही.
चिन्ता न ऊद्याची काही,
मग आज निराशा कां ही ? नच पुरती सर्व कोडूं. ७
प्राप्तस्थिति आणिक वाञ्छा
बाल्यांतहि कलहच यांचा -
गतबाल्य दुरूनि विराजे म्हणुनिच तें गोड गोड. ८
२९ सप्टेम्बर १९३३
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP