अष्टमोsध्याय:
श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत `श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार`
सिद्ध सं क्षेपें सांगत । श्रीपाद तेथूनि येत ।
कृष्णातीरीं होयी स्थित । कुरुपुरांत तारक ॥१॥
मूर्ख प्र जासमवेत । लोकनिंदेनें हो त्रस्त ।
जीव द्याया कृष्णेंत । अकस्मात देखे देव ॥२॥
प्रभू ति ला निरोपिती । आत्महत्या दुस्तर म्हणती ।
जन्मांतरीं सुपुत्राप्ती । व्हाया प्रार्थीं मग ती नारी ॥३॥
तन्नि ष्ठा ओळखून । गुरु सांगती आख्यान ।
उज्जनींत चंद्रसेन । शिर्वाचन करी प्रदोषीं ॥४॥
त्याचा अ मूल्य सन्मणी । हराया नृप तत्क्षणीं ।
घेवोनी अक्षौणी । उज्जनी वेढिते ते ॥५॥
हस्त्य श्व रथपत्ती । पाहोनी न भी चित्तीं ।
शिवा पूजी तो भूपती । तें देखती गोपपुत्र ॥६॥
अश्व त्थ संनिधानीं । अंगणीं ते पाषाणीं ।
पूजिती, त्यां एकला । पूजा लोटुनि माता त्याला ।
ओढी तो मूर्छित पडला । शिव त्याला दे सायुज्य ॥८॥
पुढें नं दस्त्री होऊन । माता लाहे कृष्णनंदन ।
ज्योतिर्लिंग तें देखून । द्वेप सोडून जाती राजे ॥९॥
पुढें सु त व्हावा तरी । शनिप्रदोष तूं करीं ।
येरू म्हणे तुम्हासरी । जन्मांतरीं पुत्र व्हावा ॥१०॥
नो भा वि कां देई वर । तया म्हणूनी शिरावर ।
मूर्खंपुत्राच्या धरी कर । विद्वद्वर तो जाहला ॥११॥
ती क रू नी प्रदोषपूजा । पुढें झाली विप्रात्मजा ।
स्वसमान नाहीं दुजा । म्हणूनी हो तत्सुत दत्त ॥१२॥
इतिश्री० प० प० वा० स० वि० स० गु० शनिप्रदोषव्रतकथनं नाम अष्टमो० ॥८॥ग्रं० सं०॥११४॥
N/A
References : N/A
Last Updated : May 20, 2016
TOP