मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार|
एकोनपंचाशत्तमोsध्याय:

एकोनपंचाशत्तमोsध्याय:

श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य


हें उ  त्त  म असे क्षेत्र । भीमामरजायोग थोर ।
रणीं सुरां मारी जालंधर । अमृतें हर त्यां उठवी ॥१॥
हृत्त  म:  प्रकाशक । शिव दे अमृत विशोक ।
उलंडलें तेची ऐक । ती हे नदी अमरजा ॥२।
ही भ  यो  पताप वारी । भीमेशीं संगम करी ।
प्रयागापरी पाप वारी । भूमीवरी हे तारक ॥३॥
सर्व  मा  न्य मनोहृत्तीर्थ । जेथ कल्पद्रू अश्वत्थ ।
पुढें संतोषाख्यतीर्थ । विश्वनाथ येथ आला ॥४।
ही उ  मे  शप्रसादानें । एका जीवन्मुक्तानें ।
काशी केली ती स्नानानें । कैवल्यानें नि:संशयें ॥५॥
तया  व  री पापविनाश । तीर्थ दाविती यतीश ।
तों भेटे त्या समयास । पूर्वाश्रमस्वसा रत्ना ॥६॥
ती त्या  म  हा तीर्थीं न्हाली । कुष्ठ जाउनी शुद्ध झाली ।
गुर्वाज्ञेनें तेथें राहिली । मुक्त झाली त्याच जन्मीं ॥७॥
वारी  सं  कट कोटितीर्थ । पुढें दाविती रुद्रतीर्थं ।
गयेसम फल तेथ । चक्रतीर्थ केशवापुढें ॥८॥
हें स  मूळ  ळ वारी दुरित । अस्थी करी चक्रांकित ।
द्वारिकेहुनी हें प्रशस्त । हो पतित स्नानें ज्ञानी ॥९॥
ज्या वे  ढो  न असे माया । येथ स्नान करितां तया ।
ये मुक्तता सुनिश्चया । गुरुराया सांगे लोकां ॥१०॥
तो पू  जा  वा कल्लेश्वर । प्राग्भागीं गोकर्णक्षेत्र ।
चक्रतीर्थ हें पवित्र । असे क्षेत्रमहात्म्य हें ॥११॥
अज्ञा  ना  नें कली येतां । सर्वतीर्थां ये गुप्तता ।
गुरुनाथें तीं दावितां । लोकचित्ता हो आनंद ॥१२॥
इतिश्री० प० प० वा० स० वि० सारे गाणगापुरवर्णनं नाम एकोनपंचाशत्तमो० ॥४९॥ग्रं० सं०॥६५४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP