द्वादशोsध्याय:
श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत `श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार`
सच्चि त्प रब्रह्म श्रवणा । न्यास हेतू तत्कारण ।
वैराग्य न कम जाण । आळस न कीजे येथ ॥१॥
कां वा रि सी तूं मज । आयुष्य जेवीं वीज ।
क्षणभंगुर देह तुज । कळे सहज मृत्यू न कीं ॥२॥
येथ मा नवांची काय । कथा मृत्यू देवां खाय ।
सन्मा र्गि न करीं विघ्न । सुपुत्रा तूं होसी म्हणून ।
मस्तकीं हस्त ठेऊन । पूर्व स्मरण तिला देई ॥४॥
म्हणे त नया श्रीपादा तूं । एक पुत्र होतां जा तूं ।
सुत म्हणे पुरतां हेतू । आज्ञा दे तूं म्हणूनी राहे ॥५॥
ज्यांचें व्यं ग अध्ययन । जे म्हणविती प्राज्ञ ।
तेही त्यापाशीं येवून । अध्ययन करिती नित्य ॥६॥
ती मा य गर्भिणी झाली । पुत्र दोन प्रसवली ।
त्या बाळें आज्ञा घेतली । वाट धरिली काशीची ॥७॥
तो स स्मि त बोले तयां । पुन: भेटें म्हणुनियां ।
काशीमध्यें येवोनियां । धरीं धैर्या करी योग ॥८॥
महा न्ग तस्मय जाणून । न्यासमार्ग स्थापीं म्हणून ।
विप्रें प्रार्थितां तो प्राज्ञ । स्वयें संन्यासी होतसे ॥९॥
जो हो ता तेथें यती । वृद्ध कृष्णसरस्वती ।
तया वरूनी गुरू होती । नरसिंहसरस्वती ॥१०॥
होऊ न नर आपण । गुरूचे गुरू असून ।
रामकृष्णापरी जाण । गुरू करून धेती गुरू ॥११॥
स्थापू नि श्रौतधर्म । फिरे सर्व तीर्थाश्रम ।
माधवा दे आश्रम । वळे जन्मभूमीकडे ॥१२॥
इतिश्री० प० प० वा० स० वि० सारे संन्यासदीक्षाग्रहणं नाम द्वादशो० ॥१२॥ग्रं० सं०॥१४५॥
N/A
References : N/A
Last Updated : May 20, 2016
TOP