एकोनविंशोsध्याय:
श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य
हो हा सं न्यासी म्हणून । भिक्षा मागे शिव आपण ।
हिरण्यकशिपुदारण । करितां नखें तापलीं ॥१॥
जो वि ज्ञै कगम्य हरि । तो श्रीदत्त औदुंबरीं ।
शांत होतां तयावरी । वास करी श्रीसहित ॥२॥
दे मा र्ग कृष्णा तया । द्वीपीं राहे योगिनी तया ।
भिक्षा देती पूजूनियां । नेणूनियां विप्र म्हणती ॥३॥
न स्व छं दीं गांवीं जायी । पाहूं येथें काय खायी ।
ऐसें म्हणुनि ते ठायीं । राहतां येयी भय त्यांला ॥४॥
तत्र त्य नर गंगानुज । भावें आला त्या गुरुराज ।
दाखवूनी तेथील गुज । देती निजप्रीती वर ॥५॥
तो न मू नी त्रिस्थली पुसे । क्षणें गुरु दावितसे ।
गुरु जाउं म्हणतसे । दु:ख होतसे योगिनीसी ॥६॥
न गू ढा: केपि मे चेष्टां । विदुरित्येष पादुके ।
विन्यस्याश्वास्य ता: प्राप । श्रीगुरुर्गाणगापुरम् ॥७॥
इतिश्री० प० प० वा० स० योगिनीवरदानं नाम एकोनविंशो० ॥१९॥ग्रं० सं०॥२१०॥
N/A
References : N/A
Last Updated : May 21, 2016
TOP