एकपंचाशत्तमोsध्याय:
श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य
आतां ए थें न रहावें । कलियुगीं गुप्त व्हावें ।
असें म्हणतां गुरुराव । अवघे दु:खित होती ते ॥१॥
गुरू त यां आश्वासून । म्हणे भजती आतां हीन ।
पुढें येतील दुर्दिन । हें जाणून गुप्त राहूं ॥२॥
जे स दूबु द्धि असती लोक । दिसों तयांसी सम्यक् ।
गाणगापुरीं राहूं भाक । घ्या हो लिक त्रिवाचेसी ॥३॥
भवा ध्वा हो तुम्हां सुगम । भजतां पादुका जे काम ।
तें पुरोनि अंतीं धाम । मिळेल नाम माझें गातां ॥४॥
भवां बु धितरणार्थ । भजा मज मिळेल स्वार्थ ।
चरित गातां मनोरथ । पुरती, व्यर्थ चिंता नसो ॥५॥
हो स द्धि त पादुकार्चनीं । विघ्नहर चिंतामणी ।
अर्चा प्रात: कृष्णास्नानीं । जाउनि रोज येयीन मी ॥६॥
भक्ति मान् भावी जसा जसा । त्यापाशीं मी तसा तसा ।
गुरूचा हो बोल ऐसा । नामधारका म्हणे सिद्ध ॥७।
रह स्या र्थ गुरुचरिताचा । सिद्धनामधारकाचा ।
संवाद जो लोकीं साचा । सार तयाआ हा चिद्रस ॥८॥
हें स त्कृ पा करुनी दत्त । वदवी प्रेरुनियां चित्त ।
तया पदीं हा समस्त । समर्पित असो ग्रंथ ॥९॥
इतिश्री० प० प० वा० स० वि० सारे वरप्रदानं नाम एकपंचाशत्तमो० ॥५१॥ग्रं० सं०॥७००॥
N/A
References : N/A
Last Updated : May 21, 2016
TOP