पंचदशोsध्याय:
श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य
शिष्यां प्र ति गुरु म्हणती । तीथें हिंडा सर्वक्षिती ।
भेटूं श्रीशैलावरती । ते म्हणती दवडूं नका ॥१॥
हे सं सृ तिहर पाद । हेची सर्वतीर्थास्पद ।
गुरु म्हणती निर्विवाद । चला खेद सोडूनियां ॥२॥
वाक्य ता दृश तें ऐकूनी । भावें शिरसा मानुनी ।
म्हणती जावें कोण्या स्थानीं । तें ऐकूनी गुरु बोले ॥३॥
सात पु री धाम चार । बारा ज्योतिर्लिंगें थोर ।
आचरतां बहु कृच्छ्र । फळ हो दूर जाय पाप ॥४॥
आच रा वें तीर्थीं क्षौर । जसा असे स्वाधिकार ।
तसा श्राद्धादिप्रकार । करितां दूर नसे क्षेम ॥५॥
जे को णी जितुके गांव । तीर्था जाती ठेवूनि भाव ।
तितुके कृच्छ्रफळ अपूर्व । तरती पूर्वज तयांचे ॥६॥
पाहु नि नदीसंगम । न्हातां पुण्य उत्तम ।
ऋतु निवर्तता ग्रीष्म । तीर्थधाम विटाळे ॥७॥
स्वध र्मा नें आठ मास । फिरा ठरा चार मास ।
नवें जळ ये नदीस । दहा दिवस ये विटाळ ॥८॥
दोष न च तीरंस्थांसी । तीन दिन महानदीसी ।
अहोरात्र र्हदकूपासी । करा ऐसी यात्रा तुम्हीं ॥९॥
पाप मो चन होयी ज्ञान । वर्ष येतां बहुधान्य ।
श्रीशैलावर मी भेटेन । तथास्तु म्हणून ते गेले ॥१०॥
इतिश्री० प० प० वा० स० गु० सारे तीर्थयात्रानुरूपणं नाम पंचदशो० ॥१५॥ग्रं० सं०॥१७६॥
N/A
References : N/A
Last Updated : May 26, 2016
TOP