एकविंशोsध्याय:
श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य
तो हो य गुरूनाथ । तियेप्रति सांगे हित ।
कोण कोणाचा हो सुत । वद ज्ञात असे तर ॥१॥
पृथ्व्यप् ते जो वाताकाश । हेच आले आकारास ।
मायामय संबंधास । तूंचि खास रडशी कीं ॥२॥
जरी सू नु तुझा हाचि । पूर्वापर असे साची ।
सांग कथा प्राग्जन्माची । तूं कोणाची स्त्री कीं माता ॥३॥
जैं सू र्यो दयास्तानें । नित्य दिन रात होणें ।
तेवीं कर्में जन्ममरणें । भोगणें सुखदु:ख्ह ॥४॥
कोणी न हें निवारिती । गुणमय ते मरती ।
देवादिकां हीच गती । मेला मागुती न ये शोकें ॥५॥
दे हा श व जाळावया । ती म्हणे जो दे अभया ।
बाध ये कीं त्याचा वाक्या । कोण तया पुढें भजे ॥६॥
सांगे शां त ब्रह्मचारी । हें जा पूस औदुंबरीं ।
येरू शव बांधुनी उदरीं । पादुकेवरी शिर हाणी ॥७॥
बोल को णाचा ऐकेना । लोक गेले स्वसदना ।
पतिसह ती अंगना । आक्रोशना करीतसे ॥८॥
स्वप्नीं न को रडूं म्हणून । स्वामी देती आश्वासन ।
पाहे जागी होवून । पुत्र संजीवन झाला ॥९॥
विप्र पा हांटस आले । त्याणीं नवल हें ऐकिलें ।
सर्वां आश्चर्य तें झालें । असें झालें वाणूं किती ॥१०॥
इतिश्री० प० प० वा० स० वि० सारे मृतपुत्रसंजीवनं नाम एकविंशो० ॥२१॥ग्रं० सं०॥२३०॥
N/A
References : N/A
Last Updated : May 21, 2016
TOP