मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार|
पंचविशोsध्याय:

पंचविशोsध्याय:

श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य


हो ते  मं  दधी ब्राह्मण । म्लेच्छराजापुढें येऊन ।
सार्थवेद म्हणून । घेते धन उन्मत्त ते ॥१॥
मेच्छा  म  दोन्मत्त विप्र । म्हणती आज्ञा द्यावी क्षिप्र ।
वादीं जिंकूं लोकीं विप्र । हारिपत्र किंवा घेवूं ॥२।
राव  म  हा नंदें देत । आज्ञा बसवी पालखींत ।
विप्र राजे म्हणवीत । भूमी जिंकित येती तेथ ॥३।
ते कु  म  सीमध्यें यती । त्रिविक्रमभारती ।
त्रिवेदी जाणुनियां येती । त्या म्हणती वाद करीं ॥४॥
जरी  मै  त्र द्विज असे । तरी करील कीं असें ।
कुबुद्धी हे विप्र जसे । हरती तसें करावें ॥५॥
यांची  वां  छा गुरु पुरवील । असें म्हणोनी त्यां तत्काल ।
यती आणि गुरूजवळ । सांगे सकळ त्रिविक्रम ॥६॥
वाद्यां  शो  धीत हे आले । यांणी माझें न ऐकिलें ।
मग येथें आणिले । यां शिक्षिले पाहिजेत ॥७॥
गुरू  जी  म्हणती तयां । नेणो आम्ही जयाsजया ।
वाद आम्हां कासया । तुम्ही वायां मरूं नका ॥८॥
विप्र  व  चन बोलती । तुम्हां काय विद्या येती ।
तें ऐकुनि गुरु म्हणती । गर्व किती करितां हा ॥९॥
गर्वे  लो  कीं किती मेले । बाण रावण खपले ।
व्यर्थ कौरवादी मेले । आरंभिलें काय हें तुम्हीं ॥१०॥
इतिश्री० प० प० वा० स० वि० सारे उन्मत्तद्विजाख्यानं नाम पंचविशो० ॥२५॥ग्रं० सं०॥२५५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP