मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार|
एकचत्वारिंशोsध्याय:

एकचत्वारिंशोsध्याय:

श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य


निर  हं  कार त्वत्पूर्वज । सायंदेव कथिला तूज ।
गाणगापुरीं वसे निज । गुरुराज साक्षाद्देव ॥१॥
ही त  द्वा  र्ता परिसून । ये घालित लोटांगण ।
देवा पहातां हो तल्लीन । करी स्तवन प्रेमरसें ॥२॥
गुरु  वि  चारिती क्षेम । येरू सांगे धरुनी प्रेम ।
भवत्सेवाकाम । धरुनी, धाम सोडियेलें ॥३॥
घ्यावी  मौ  ज भक्तिरसाची । असी इच्छा हे मनाची ।
गुरु म्हणे सेवा आमुची । कठिण साची नेणसी तूं ॥४॥
कधीं  पु  रामध्यें वास । ग्रामीं वनीं नदीतीरास ।
तुला होती कष्ट सायास । कां तूं त्रास पतकरसी ॥५॥
तो क  रु  नी अंगिकार । राहे गुरूच्या बरोबर ।
त्याला एकला बाहेर । संगमावर न्हेति गुरू ॥६॥
जो दो षौ  घा स्मरणें हरी । तो संकटीं त्यजि कीं हरी ।
हार्दें शिष्यपरिक्षा करी । आज्ञा करी मेघा वर्षूं ॥७॥
तेव्हां  लो  टुनी टांकी वारा । वर्षे मेघ मोठ्या धारा ।
द्विजें साहुनी वृष्टि वारा । रक्षिलें वस्त्राश्रयें देवा ॥८॥
गुरू  के  वल परीक्षार्थ । अग्नि आणावया धाडित ।
विद्युत्तेजें ये गांवांत । अग्नि भांड्यांत घेऊन ये ॥९॥
प्रत्य  क्ष  पथिं सर्पां देखे । पळतां, मठीं ध्वनी ऐके ।
प्रकाश देखे मनीं ठके । येउनि देखे एका देवा ॥१०॥
सर्प  र  क्षार्थ धाडिले । तुझें मन वायां भ्यालें ।
कठिण सेवा हें कळलें । साहस केलें त्वा गुरु म्हणे ॥११॥
हो प  श्चा  त्ताप कीं तुला । द्विज म्हणे देवा मला ।
जाणसी, मी काय तुला । सांगूं, मला न दवडी ॥१२॥
प्रत्य  क्ष  तूं ब्रह्मनिधान । गुरुसेवेचें विधान ।
सांगा तेणें स्थिर होईन । तें ऐकून गुरू सांगे ॥१३॥
कुमार  र  त्वष्ट्रदेवाचा । विद्यार्थी हो गुरूचा ।
भाव पहावया त्याचा । गुरू साचा वदे तया ॥१४॥
करीं  ए  क गृह निर्माण । जें न तुटे नोहे जीर्ण ।
करी वृष्ट्यादि निवारण । तें ऐकून तत्स्त्री बोले ॥१५॥
न शिं  व  ली न विणली । अंगाबरोबर भली ।
अशी रम्य दे मज चोळी । त्यावेळीं तत्सुत बोले ॥१६॥
माझ्या  च  रणा सुख देती । खात न लागे, मनोगती ।
दे पादुका जळीं न बुडती । गुरुकन्या तीही बोले ॥१७॥
हो अ  क्ष यैकस्तंभघर । न हो पात्रीं पाक गार ।
काजळ न लागे त्यावर । दे सुंदर कुंडलें हीं ॥१८॥
कुमा  र  तो स्वीकारून । त्यां वंदून धरी रान ।
तेथें अवधूत येऊन । म्हणे कां म्लान मुख तुझें ॥१९॥
मन  स्स  माधान करून । बाळ सांगे सर्व नमून ।
येरु तया आश्वासून । काशीसेवन करी म्हणे ॥२०॥
जें श  र्वा  चें अधिष्ठान । गंगा राहे ज्या वेष्टून ।
सर्वदेवतीर्थस्थान । तत्सेवन करीं शीघ्र ॥२१॥
न को  णि  ही येथ अमुक्त । म्हणोनी हें हो अविमुक्ता ।
विरक्त किंवा विंषयसक्त । तेही मुक्त होती जेथ ॥२२॥
दुजें  भू  मंडळीं न असें । येरू वदे मी नेणतसें ।
काशीक्षेत्र मिळेल कसें । प्रार्थितसें मी तुम्हांस्सी ॥२३॥
म्हणे  ता  पसी मी दावीन । त्वद्योगें हो मज दर्शन ।
असें म्हणूनी त्या घेऊन । ये तत्क्षण मनोगती ॥२४॥
घेउ  नि  आला मनोगति । काशीयात्रा भावभक्तीं ।
करीं यथाविधी, निगुती । पूर्ण होती मनोरथ ॥२५॥
तो ऐ  कू  नि त्याचें वचन । म्हणे नेणें यात्राचरण ।
येरू म्हणे स्नान करून । मणिकर्णिकेचें येईं ॥२६॥
तूं भे  ट  विश्वेश्वरा । करी अंतर्गृहयात्रा ।
मग दक्षिणमानसयात्रा । स्नानार्चनश्राद्धदानें ॥२७॥
इतिश्री० प० प० वा० स० वि० सारे काशीयात्रानिरूपणं नाम एकचत्वारिंशो० ॥४१॥ग्रं० सं०॥५७४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP