मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|समग्र दिवाकर|मी माझ्याशी|

विश्वास

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे
‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.


- उगीच लोकांतच तेवढ्या गप्पा मारायच्या नाही ?
- का ? काय झाले ?
- म्हणे माझा ईश्वरावर विश्वास नाही !
- हो, मग नाहीच ! अजूनही मला तसेच -
- आणि काल रात्री ? नुसती भयंकर स्वप्ने पडायला लागली
मात्र, तोच भेदरुन जाऊन रामराम असा सारखा जप
चालविला होतास.
- हो, ते खरे, पण....
- पण काय ! अजून नुसती स्वप्नेच आहेत ! एखादे खरोखरीच
संकट येऊ दे, म्हणजे मग पाहीन कशी काय..... का आता
आभाळाकडे पाह्यला लागली स्वारी ?
- नाही, असे नाही.
- हं हं, तसे नाही काय !

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP