बारीकसारीक गोष्टीमधचे
नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे
‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.
- पण ते काही बरे झाले नाही.
- हो. असे तर खरेच.
- नसेल त्यांना समजत, पण तुम्हाला काही कळत नाही,
असे म्हणायला नको होते.
- पण ते नाही आधी म्हणाले की, तुम्हाला काही कळत नाही
म्हणून ?
- ते एक म्हणाले रे. पण आपण तसे न म्हणणे हा
चांगुलपणा आहे. नाही का ? त्यांचे त्यांना. पण आपणही
तसेच करणे, म्हणजे त्यांच्यात आणि आपल्यात फरक तो
काय राह्यला ?
- जपून बोलायला पाहिजे एवढे खरे. मलासुध्दा आता - कसेसेच
वाटत आहे.
- नुसते येवढे म्हटले असते म्हणजे बस्स झाले असते, की,
तुम्ही म्हणता तसे मला वाटत नाही म्हणून.
- पण काय इतके बारिकसारिक गोष्टींमध्ये.....
- हां, हेच ते ! बारीक सारीक गोष्टीमध्येच तर उगीच
कोणाला दुखावता कामा नये.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP