मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|समग्र दिवाकर|मी माझ्याशी|
टोचणी नको

टोचणी नको

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे
‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.


- ते खरे ! पण आपले नाही बोवा समाधान होत ! परत जाऊन तिला विचारू तर खरे. चल.
- आता इतकेतुळशीबागेपर्यंत आलो, आणि येथून परत फिरायचे ?
- नाही बोवा. आपल्याच्याने नाही पुढे येववत.
- बरे तर चलच. उगीच संशय नको. पण काय रे, तिने पैसे घेऊन नाही म्हटले तर ?
- तरी हरकत नाही. पुनः तिचे पैसे देऊन टाकू पण आपण दुसर्‍याचे पैसे बुडविले अशी संशयाची वारंवार टोचणी नको ! - हां, हेच ते - दुकान, विचार बरे तिला.
- बाई, मघाशी मी येथे शेरभर कांदे घेतले, त्याचे दोन पैसे मी तुम्हाला दिले का ?
- ( हा, दोन पैसे ना ? दिले, दिले. )
- मला काही बरोबर आठवेना म्हणून -
- ( पैसे दिले, दिले बरे बाबा. )
- हां, आता कसे ठीक झाले ! चला आता.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP