ही आपली खुशाल हसत आहे
नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे
‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.
- च्चू ! तो एक हासत आहे. पण त्याच्याबरोबर ही आपली
खुशाल हसत आहे !
-आणि त्याच्याकडे पाहून !
- नाही, हे नाही आपल्याला पसंत !
- मला सुध्दा - बाकी झाले ते हसण्याजोगेच झाले !
- म्हणून काय झाले ! तिने हसायचे होते - खुशाल हसायचे
होते. पण त्या परपुरुषाकडे पाहून ? छे !
- पण तिने तरी काय सहजच पाहिले असेल. मुद्दाम जाणून
बुजून -
- तरी - पण कसेसेच वाटते !
- हं: काय चमत्कार आहे ! नुसते आपल्या बायकोने सहज
परपुरुषाकडे कोठे पाहिले, तो झाले, बिघडले !
- तू काय वाटेल ते म्हण ! पण....
- काय पण काय ! आपण दुसर्यांच्या बायकांकडे पाहता
तेव्हा ? तेव्हा नाही कोठे ? आणि म्हणे, बायकांनी आणि
पुरुषांनी खुशाल एकत्र मिसळावे, बोलावे, हसावे, खेळावे,
असे आमचे मत आहे ! आम्ही मोठे लिबरल ! हं:
- चप् रे ! मला नाही -
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP