मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|समग्र दिवाकर|मी माझ्याशी|
चोरायचा ? आणि तो कुणाचा ?

चोरायचा ? आणि तो कुणाचा ?

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे
‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.


- फोटो किती छान आहे नाही ?
- फारच चांगला आहे !
- असाच शेलीचा फोटो मी मुंबईहून मागवला आहे ! पण त्या - रावाने
अजून पाठविलाच नाही. येईल.
- अरे ! फोटो पुस्तकांतून निघालेला दिसतो आहे ! - फारच छान आहे
बोवा ! काय डोळे आहेत !
- आहेत खरेच !
- ए ! मी तुला एक सांगू का ? पण, नको -
- काय, काय ?
- ऐकशील तर सांगतो, नाही तर काय उगीच.
- पण आधी सांग तर खरे.
- कान कर इकडे, म्हणजे सांगतो.
- हं, काय ?
- हा फोटो आहे ना ? तो तसाच ठेऊन दे.
- म्हणजे !
- आधीच तो पुस्तकांतून निघालेला आहे, तेव्हा मी म्हणतो, ठेवावा
झाले.
- अरे पण हे लायब्ररीचे पुस्तक आहे !
- ए: ! त्यात काय आहे मोठेसे ! आयता फोटो निघालेलाच आहे
तेव्हा - आणि कारकुनाला कोठे ठाऊक आहे की, त्याच्यात फोटो
आहे म्हणून ! बोलू नये न सवरु नये ! आपले गुपचुप -
- गप बैस ! काय, काही तरी सांगतोस ! अगदी समजत नाही तुला !
चमत्कारिक ! असे करावेसे तुला वाटले तरी कसे हेच समजत नाही !
शेलीचा फोटो ! आणि तो चोरायचा ?  शेलीचा ?
- अरे हो !

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP