पण -
नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे
‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.
- क्यंव् मियाजी ! कशाचा एवढा विचार चालला आहे
- काही नाही, काही नाही !
- तरी पण...
- त्या... ह्याच्याकडे जेवायला यायचे कबूल केले आहे...
- मग ? जायचे. त्यात एवढे बिघडले काय ?
- त...से नाही. हरकत काही नाही म्हणा... पण जरा.... कसेसेच वाटते बोवा !
- कसेसेच वाटते ? अन् ते कशापायी ?
- त्याचे असे आहे... तो नाही... आपल्या जातीचा...
- हं !
- म्हणजे, ब्राह्मण नाही... त्यामुळे जरा...
- अं ! उसमे क्या आहे जी !
- आहे... आणि नाही... तुला जरा त्यातले...
- पण आजपर्यंत तू नाही का असा गेलास ?
- ते खरे ! आजपर्यंत गेलो. असल्या गोष्टीचे काही वाटले नाही, ते सगळे खरे ! पण -
- हं ! आज पुनः बोकांडी बसला वाटते ?
- कोण ?
- पिढ्यान् पिढ्या बोकांडी बसणारा हा... ‘ पण ’ - चा समंध !... तो काही झाडाला सोडत नाही ! पुस्तकी ज्ञानाच्या मा-रे...
- सोडीत नाही खराच ! धूप घातला पण काही -
- काय म्हणणे काय आहे त्याचे !
- तो म्हणतो, ‘ तुझे आता दुसरे लग्न व्हायचे आहे तेव्हा असल्या भानगडीत जरा... तूर्त न पडलेले बरे ! ’
- हाः ! हाः ! हाः !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP