कोण बोलवते ?
नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे
कसे बोललो... का - ही - समजत नाही... !
आता म्हणजे परीक्षेला बसणारी बाई... पुस्तक त्यांना ते नेमलेले ! अन् त्यांनाच म्हणायचे... बायरनचे ‘ चाईल्ड हॅरॉल्ड ’ समजत का नाही तुम्हाला ?
अन् ऐकल्याबरोबर दचकल्या काय त्या !
क्च् ! काय म्हणावे याला... ! हा... चाचपडत बोलण्याचा परिणाम का हलकटपणा... !
इतके काही...
काय इतके काय नाही ! अशाने... पुढे ‘ पाऊल टाकू की नको... टाकू की नको ? ’ अस्से... होऊन जाते !
कोण विचित्र आयुष्य हे ! मनापासून... अगदी मनापासून बोलावेसे वाटते ! पण ते तर साधत नाही... परवडत नाही ! अन् मग हे अस्से... !
जाऊ दे बोवा !
पण... मी म्हणतो... त्यांना विचारायच्या आधी... तुझ्या लक्षात कसे नाही आले ?
नाही बोवा अगदी मागमूस नाही !
चमत्कार आहे ! तुलाही बोलावेसे वाटत नाही, मलाही वाटत नाही... असे असून... काही... काही वेळेला का रे ? कावराबावरा होऊन भोवताली असा पहातोस आहेस सा ?
मला वाटते... ! हो ! मला वाटते... आपणा दोघांच्याही नरड्यांना फास आहेत !
काय ! भोवताली... तिसरे कोणी तरी वावरते आहे खास !
अरे बा-परे !!
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP