भलता नाद
नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे
‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.
- तसे वाटण्याचे काही कारण दिसत नाही.
- पण त्यांना असे वाटते की, हे सगळे जग दु:खाने भरलेले
आहे अशी तुझी समजूत आहे म्हणून.
- पण वास्तविक तसे नाही. माझ्यावर दु:खाची अभ्रे येऊन
वरचेवर पाऊस पडत आहे, म्हणून इतर ठिकाणी सुखाचा
प्रकाश नाही असे म्हणून कसे चालेल ? जगात सुखही
आहे आणि दु:खही आहे. आता काही माणसे जशी नेहमी
सुखी असतात तशी जन्मापासून काही दु:खीही -
- नेहमी आपले तुझे दु:खच ! सुखाची आशा तुला मुळी
नाहीच का ?
- सुखाची आशा ! कोणी सांगावे पुढे कदाचित मला सुख
मिळेलही. पण मी जगात पाऊल टाकल्यापासून तो
आतापर्यंत भारी हाल.... खरोखर अतिशय यातना सोशीत
आलो आहे !
- बरे यात दोष कोणाचा ?
- दोष ? दोष माझाच !
- तो कसा ?
- अरे मीच स्वत: होऊन जर भलत्याच नादाला लागून
आपल्याभोवती मोठमोठी आणि उंचउंच संकटे उभारुन
ठेवली आहेत, तर असा हा दु:खाचा पाऊस पडेल नाही तर
काय होईल ?
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP